आयसीआयसीआय बँकेतर्फे भांडवली बाजारपेठेतील सहभागी आणि कस्टडी सेवेसाठी डिजिटल सुविधा लाँच
मुंबई – आयसीआयसीआय बँकेने आज भांडवली बाजारातील सहभागी आणि कस्टडी सेवेच्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या डिजिटल सुविधा लाँच केल्या आहेत. या सुविधांमुळे या क्षेत्रातील स्टॉक ब्रोकर्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमएस) पुरवठादार, फॉरिन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय), फॉरिन डायरेक्ट इन्व्हेस्टर्स (एफडीआय) आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स (एआयएफ) अशा सहभागींना सुलभपणे त्यांच्या बँकिंगविषयक गरजा पूर्ण करता येणार आहेत. बँकेने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या भारतीय भांडवली बाजारपेठेच्या सर्व सहभागींच्या सोयीसाठी ऑनबोर्डिंगची सुविधा वेगवान केली आहे.
नव्याने लाँच झालेल्या 3-in-1 खात्यामुळे स्टॉक ब्रोकर्सच्या ग्राहकांना डिजिटल पद्धतीने ऑनलाइन ट्रेडिंग, डीमॅट आणि बचत खाते देशभरात कुठूनही केवळ काही तासांत सुरू करता येणार आहे. या सुविधेमुळे स्टॉक ब्रोकर्सना एपीआयच्या माध्यमातून त्यांची ट्रेडिंग व डिपॉझिटरी यंत्रणा बँकेसह समाविष्ट करता येईल व पर्यायाने गुंतवणुकदारांच्या पैशांच्या उपलब्धतेविषयी रियल टाइम माहिती देणे शक्य होईल.
बँकेने पीएमएस सेवा पुरवठादारांनाही कामाच्या एकाच दिवसात बचत खाते आणि डीमॅट खाते डिजिटल पद्धतीने सुरू करण्याची सुविधा देत सक्षम केले आहे.
त्याशिवाय बँकेने जगभरात कुठल्याही देशातून एफपीआय/एफडीआयचे ऑनबोर्डिंग आणि नोंदणीसाठी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. या प्लॅटफॉर्ममुळे एफपीआय/एफडीआय पूर्व- पडताळणीसाठी सहजपणे कागदपत्रे आणि माहिती अपलोड करता येईल व पर्यायाने नोंदणी आणि ऑनबोर्डिंगचे काम केवळ काही दिवसांत पूर्ण होईल.
या लाँचविषयी आयसीआयसीआय बँकेच्या लार्ज क्लाएंट्स समूहाचे प्रमुख श्री. सुमीत सांघाई म्हणाले, ‘भारतीय भांडवली बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत लक्षणीय विकास झाला असून ते डीमॅट खात्यांची वाढती संख्या, म्युच्युअल फंड उद्योगातील वाढता एयूएम आणि देशातील भांडवली प्रवाहात झालेली वाढ यावरून दिसून येते. नोंदणीकृत भारतीय कंपन्यांचे भांडवल गेल्या पाच वर्षांत १४८ ट्रिलियन रुपयांवरून २५७ ट्रिलियन रुपयांवर गेले आहे. आमच्या मते, बाजारपेठेत यापुढेही असाच विकास होत राहील आणि २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्यासाठी भारताला चालना मिळेल. बँकेने लाँच केलेल्या डिजिटल सुविधांची श्रेणी भांडवली बाजारपेठ आणि कस्टडी सेवेच्या सहभागींना नियामक गरजा पूर्ण करण्यासाठी, मानवी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पर्यायाने व्यवसायातील कार्यक्षमता व व्याप्ती वाढवण्यासाठी मदत करेल.’
भांडवली बाजारपेठ आणि कस्टडी सेवेतील घटकांसाठीच्या प्रमुख डिजिटल सुविधा पुढीलप्रमाणे –
ब्रोकर्स आणि ग्राहकांठी ‘3-in-1’ खाते सुविधा – या सुविधेमुळे गुंतवणुकदारांना केवळ काही तासांत पूर्णपणे डिजिटल पद्धतीने डीमॅट, बचत खाते आणि ट्रेडिंग खाते सुरू करता येईल. या सुविधेच्या मदतीने गुंतवणुकदारांना एखाद्या व्यवहारासाठीची त्यांच्या खात्यातील विशिष्ट रक्कम ब्रोकरला हस्तांतरित करण्याऐवजी ब्लॉक करून ठेवता येईल. यामुळे गुंतवणुकदारांना ट्रेडची अमलबजावणी झाल्यानंतरच पैसे भरण्याची लवचिकता प्रात होईल. त्याशिवाय ब्रोकर्सना त्यांची यंत्रणा बँकेसह समाविष्ट करून गुंतवणुकदारांकडे असलेल्या पैशांची रियल टाइम माहिती उपलब्ध होऊ शकते. एरवी ७ ते १० दिवसांत सुरू होणारे प्रत्यक्ष खाते इथे एकाच दिवसात सोप्या डिजिटल पद्धतीने सुरू करता येऊ शकते.
एफपीआय/एफडीआय ग्राहकांचे डिजिटल ऑनबोर्डिंग आणि पूर्व- पडताळणी – बँकेतर्फे एफपीआय/एफडीआय ऑनबोर्डिंगसाठी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म पुरवला जातो. वेगवेगळ्या टाइम झोन्सच्या हाताळणीसाठी लागणारा प्रदीर्घ वेळ डिजिटल प्रक्रियेमध्ये कमी होतो. ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, मेमोरँडम ऑफ असोसिएशन, रेग्युलेटरी लायसन्सेस अशाप्रकारच्यासाठी पूर्व- पडताळणी आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करता येतील. जर काही शंका असल्यास त्यांचे प्लॅटफॉर्मवरील संवादी पद्धतीने निरसन केले जाते. रेग्युलेटरच्या आवश्यकतेप्रमाणे ग्राहकांना प्रत्यक्ष कागदपत्रे पाठवावी लागतात. डिजिटल प्रक्रियेमुळे ऑनबोर्डिंग प्रक्रिया सोपी होते व कस्टडी खाते सुरू करण्यासाठी लागणारा वेळ या क्षेत्रातील एरवीच्या२ ते ३ आठवड्यांवरून थेट काही दिवसांपर्यंत कमी होतो. यामध्ये ईमेलवर कागदपत्रांची देवाणघेवाण करण्याची गरज राहात नाही.
सेल्फ- सर्व्हिस पोर्टल – बँकेद्वारे पीएमएफस, एआयएफ आणि फॉरिन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एफआयआय) यांचा समावेश असलेल्या कस्टडी सेवेच्या ग्राहकांना सेल्फ- सर्व्हिस पोर्टल सुविधा दिली जाते. या सेवेच्या माध्यमातून त्यांना कस्टडी होल्डिंग्ज, व्यवहार आणि वेब कस्टडी या नव्या कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे विविध अहवाल दिले जातात. बँकेद्वारे ई- प्रोटेक्टर अप्लिकेशन हा डिजिटल डॅशबोर्ड मार्जिन युटिलायझेशन, मार्जिन पर स्क्रिप्ट आणि ट्रेड अथोरायझेशनवर रियल टाइम देखरेख करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह्ज क्लियरिंग सेवा घेणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो
एआयएफसाठी मूल्यवर्धित सेवा – बँकेतर्फे एआयएफना फंड अकाउंटिंग, फॉरेक्स, एस्क्रो अरेंजमेट, डिजिटल कलेक्शन आणि पेमेंट सुविधा अशा प्रकारच्या सेवा दिल्या जातात. बँकेच्या अद्ययावत फंड अकाउंटिंग सॉफ्टवेयरमध्ये एआयएफ आणि त्यांच्या गुंतवणुकदारांना वेब बेस्ड अक्सेसबरोबरच रेग्युलेटरी रिपोर्टिंगसह सर्व असेट क्लासेस हाताळण्याची क्षमता असते. बँकेतर्फे एआयएफ पोर्टफोलिओ कंपन्यांच्या वैविध्यपूर्ण आवश्यकतांसाठी कस्टमाइज्ड एस्क्रो सेवा दिल्या जातात व त्यामध्ये खरेदी करार, शेयर बायबॅक, मर्जर, डीमॅट एस्क्रो, रेरा खाते आणि क्रेडिट लिंक्ड अरेंजमेंट्स यांचा समावेश आहे.
डिजिटल कलेक्शन सेवा – बँकेतर्फे गुंतवणुकदारांकडून निधी आणि मार्जिन रक्कम गोळा करण्यासाठी कस्टमाइज्ड सुविधा दिली जाते. कलेक्शन सुविधांच्या यादीत ई- कलेक्शन, ई- मँडेट्स, ई- नाच आणि युपीआय इंटरफेज अशा डिजिटल चॅनेल्सचा समावेश होतो. ही चॅनेल्स ग्राहकांच्या यंत्रणेत अत्याधुनिक एपीआयसह समाविष्ट केली जातात. यामुळे त्यांना स्वयंचलित रिकन्सिलिएशन आणि रोखीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास मदत होते.
डिजिटल पेमेंट सुविधा – बँकेद्वारे भांडवली बाजारपेठ आणि कस्टडी सेवेच्या सहभागींसाठी खास तयार करण्यात आलेल्या सुविधा दिल्या जातात. या सुविधांच्या मदतीने त्यांना एक्सचेंज पे- इन, इन्व्हेस्टर पेमेंट, व्हेंडर्स आणि स्टॅच्युटरी पेआउट एक्सपेन्स पेमेंट अशा प्रकारच्या पेमेंट सुविधा राबवता येतात. सहभागींना थेट बँकेची यंत्रणा आणि युपीआय स्टॅकमध्ये समाविष्ट होता येते आणि त्यांच्या ईआरपी यंत्रणेत पेमेंट सुविधा गुंफता येतात. हे बँकेसह सुरक्षित व वेगवान पद्धतीने एपीआय इंटिग्रेशनसह करता येऊ शकते. या एकत्रीकरणामुळे सहभागींना रियल टाइम स्टेटस अपडेट्स, वेगवान कर्ज, स्वयंचलित रिकन्सिलएशन आणि त्यांच्या ग्राहक यंत्रणांकडून प्रमाणीकरण करण्यास मदत होते.
