fbpx

YouTube भारतीय वंशाचे नील मोहन नवे सीईओ

न्यूयॉर्क : भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुसान व्होजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली. यूट्यूब हा जगातील सर्वात लोकप्रिय व्हीडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.

यूटयूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी (१६ फेब्रुवारी) याबाबतची घोषणा केली. वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुसान व्होजिकी यांचा राजीनामा दरम्यान, आपले कुटूंब, आरोग्य व काही वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यूट्यूब कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुसान व्होजिकी यांनी दिली आहे. त्यांनी यूट्यूबच्या कर्मचा-यांना एक पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली. यूट्यूब जगातील सर्वात लोकप्रिय व्हीडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. नील मोहन सीईओबरोबरच यूट्यूबचे सीनियर व्हाइस-प्रेसिडेंटच्या भूमिकेतही असणार आहेत.

नील मोहन यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर होते. नोव्हेंबर २०१५ मध्ये ते यूट्यूबमध्ये रुजू झाले होते. नील मोहन यांच्या लिंक्डन प्रोफाइलनुसार त्यांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीतून एमबीए केले आहे. त्यांनी करिअरची सुरुवात एक्सचेंर कंपनीसोबत केली होती. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सुसान यांनी एक खूपच चांगली टीम बनवली आहे. नीलच्या रुपात त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे. ते येणा-या दशकात यूट्यूबचे नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: