Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पगार न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

सांगली : जिल्ह्यात एका एसटी महामंडळाच्या कर्मचा-याने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

भीमराव सूर्यवंशी असे एसटी कर्मचा-याचे नाव आहे. भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. भीमराव सूर्यवंशी यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर काम करत होते. न्यायालयाचा आदेश असूनही पगार वेळेत होत नसल्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी तणावाखाली आहेत. सूर्यवंशी देखील तणावाखाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading