आपणच उमेदवार आहोत असे समजून काम करा- नाना पटोले
पुणे: कसबापेठ विधानसभेची पोटनिवडणुक आपण पक्ष म्हणून लढवत आहोत. उमेदवारांनीआपल्याला नमस्कार करावा, अशी अपेक्षा न ठेवता आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजूनप्रत्येकाने काम करावे, असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनादिले. ही निवडणुक आपली ताकद दाखवण्याची आणि आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवातकरण्याची चांगली सुरुवात आहे, असेही पटोलेम्हणाले. कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरयांच्या प्रचारार्थ शनिवारी काँग्रेस भवन येथे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखालीपक्षाच्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनामार्गदर्शन करताना पटोले बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार रमेशबागवे, मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, बाळासाहेबशिवरकर, दिप्ती चवधरी, संगीता तिवारी, अजित दरेकर, विशाल मलके आदींसह काँग्रेसच्या सर्वच आघाड्यांचे अध्यक्ष वपदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध आघाड्यांच्या अध्यक्षांनी निवडणुकीच्याप्रचारासाठी व मतदान होण्यासाठी काय उपाय योजना केल्या जात आहेत, पुढील दिवसात काय काम केली जाणार आहेत, याची माहिती दिली. पटोले म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारजेवढ्या मताने मागे होता, तो लिड तोडून आपणास भाजप उमेदवारावर तेवढाच लिड घ्यायचा आहे. आपण हीपोटनिवडणुक पक्ष म्हणून लढवत आहोत. त्यामुळे आपणास आपली ताकद दाखवण्याची संधीआहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ला उमेदवार समजून काम करणे गरजेचे आहे. पुण्यातअनेक मोठे नेते तयार झाले आहेत, पुणे हे राजकारणाचे माहेरघरआहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने आपणास राजकीय जीवनाची सुरूवात करण्याचीचांगली संधी मिळाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडूनही शिकण्याची संधी आपणास मिळणार आहे. मतदार संघात २७०बुथ आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी चोख पद्धतीने पारपाडणे गरजेचे आहे. डॉक्टर सेलच्या सदस्यांनी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना शासनाच्याचुकीच्या धोरणांची व कामाची माहिती देवून त्यांचे मत परिवर्तन करून त्याचे रुपांतरमहाविकास आघाडीचा उमेदवारास कसे मिळेल, यासाठी काम करणे गरजेचे आहे. इतर सेलच्या पदाधिकाऱ्यांनीही राज्य वकेंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांची, खासगीकरणाची, बेरोजगारी, महागाई याबाबतीत नागरिकांना माहिती देवून काँग्रेस पक्षच नागरिकांनान्याय देवू शकते, हे पटवून दिले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
