Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पुणे, ता. ११ ः कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑङ्ग इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज गोटीराम भैय्या चौक, भैरोसिंग घोरपडे उद्यान परिसरात आज पदयात्रा काढण्यात आली होती.
अजय खेडेकर, विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, आरती कोंढरे, विष्णू हरिहर, लीनाताई पानसरे, धनंजय जाधव, स्वप्नील नाईक, भरत लगड, राजाभाऊ भिलारे, रमेश जगताप, सुशील सर्वगौड, निलेश आल्हाट, नामदेव माळवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वाहतकीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन रासने यांनी यावेळी दिले.

महायुतीच्या कार्यालयाचे उद्धघाटन
महायुतीच्या उमेदवार हेमंत रासने यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. निवडणुक प्रमुख माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभाृह नेते गणेश बिडकर, शिवसेना बाळासाहेबांचीचे किरण साळी, आरपीआयचे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, रा. स. प. चे शहर अध्यक्ष भरत लगड, पतित पावनचे राजाभाऊ पाटील, सुहास कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
२०१९ मध्ये विश्‍वासघाताने आलेले, घरी बसून कारभार करणारे, विकासाची कामे न करणारे आणि भ‘ष्टाचारी महाविकास आघाडीचे सरकार की जनतेच्या विकासाला प्राधान्य देणारे, विकासाची कामे करणारे, जनतेचु जीवन सुरळीत करण्यासाठी निर्णय घेणारे भाजप आणि शिवसेनेचे सरकार यात कोणते सरकार योग्य आहे याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. मतदार महाविकास आघाडीला धडा शिकवतील आणि भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्‍वास वाटतो.

महायुतीतील पक्षांची बैठक
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. निवडणुकीतील प्रचाराचे या बैठकीत नियोजन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading