Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

कोशियारींची हकालपट्टी न करून मोदी सरकारने त्यांचा सन्मान जपला परंतु महाराष्ट्राचा अपमान केला -राष्ट्रवादी

पुणे:महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक अवमान जनक वक्तव्य करणारे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना राज्यपाल पदावरून हटविल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पर्वती येथे पेढे वाटून आनंद साजरा केला.

एखाद्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, अभिमान आदींची किमान माहिती बाळगणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भावनांची अजिबात जाणिव नाही अशीच त्यांची आजवरची वागणूक पाहता दिसते. छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये करुन त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. आज त्यांना हटविण्याचा आनंद राज्यातील सर्वच जनतेला झाला आहे तरीही सरकारला है उशिरा सुचलेले शहाणपण आहे , जर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला महापुरुषांबद्दल अस्मिता असती तर त्यांनी वेळीच राज्यपालांची हकालपट्टी केली असती आणि आजचा हा जल्लोष अधिक मोठा करता आला असता , परंतु त्यांनी तसे केले नाही.अखेर राज्यपालांनी स्वतः च निवृत्ती मागितल्यानंतर केंद्र सरकारने अखेर आज त्यांना पदावरून हटविले आहे.
या प्रसंगी माझ्या समवेत मा.नगरसेविका प्रियाताई गदादे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे विपुल म्हैसुरकर , मृणालिनीताई वाणी ,किशोर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading