Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

ऑईल इंडिया लिमिटेड, एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघांची विजयी आगेकूच

अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा !!

पुणे : भारतीय खाद्य निगम (फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आणि एडएसपीसी, पश्‍चिम यांच्या तर्फे आयोजित अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धेत ऑईल इंडिया लिमिटेड आणि एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी आगेकूच केली.

श्री शिवछत्रपती क्रिडा संकूल, बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ऑईल इंडिया संघाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघाचा ५-० असा सहज पराभव केला. ऑईल इंडिया संघाचा हा दुसरा विजय ठरला. याआधीच्या सामन्यात ऑईल इंडिया संघाने न्यावली लिग्नाइट कॉर्पोरेशन (एनएलसी) इंडिया संघाचा १७-० असा धुव्वा उडविला होता. या सामन्यात तुलया दास याने २४ आणि ३९ मिनिटाला गोल नोंदविले. अकरंग नाझरे, राहील दास आणि मिन्टी बारो यांनी प्रत्येकी एकेक गोल नोंदवित संघाला सहज विजय मिळवून दिला.

दुसर्‍या सामन्यात एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने टायब्रेकमध्ये बँक ऑफ बडोदा संघाचा ४-२ असा पराभव केला. एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाचा हा दुसरा विजय ठरला. अतितटीच्या झालेल्या सामन्यात पुर्वार्ध गोलशुन्य बरोबरीमध्ये सुटला. उत्तरर्धात महोम्मद अन्सारी याने ६७ व्या मिनिटाला गोल करून बँक ऑफ बडोदा संघाचे खाते उघडले. यानंतर निखील कांकरा याने ७४ मिनिटाला गोल करून एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाला १-१ अशी बरोबरी निर्माण करून दिली.

पूर्णवेळ १-१ बरोबरीची कोंडी कायम राहीली. त्यामुळे सामन्यामध्ये टायब्रेक पध्दतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये बँक ऑफ बडोदा संघाकडून रक्शित एस. केवळ यालाच गोल नोंदविता आला. एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाकडून पवन जे., एस. विनबा आणि अनुपम जी. यांनी गोल करून संघाला सामन्यात विजय मिळवून दिला. बँक ऑल बडोदा संघाच्या अनस के., चिराग एस आणि अर्पित ए. यांना टायब्रेकमध्ये गोल करण्यात अपयश आले.

स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः
१) ऑईल इंडियाः ५ (तुलया दास २४, ३९ मि., अकरंग नाझरे ३२ मि., राहील दास ६३ मि., मिन्टी बारो ९० मि.) वि.वि. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाः ०;
२) एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः ४ (निखील कांकरा ७४ मि., पवन जे., एस. विनबा, अनुपम जी.) टायब्रेकमध्ये वि.वि. बँक ऑफ बडोदाः २ (महोम्मद अन्सारी ६७ मि., रक्शित एस.); फुट टाईमः १-१;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading