fbpx

‘वी’ ने १४० ‘वी’ शॉप्स सुरु करून ग्रामीण महाराष्ट्रात रिटेल विस्ताराचे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले  

पुणे : ग्रामीण ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचून त्यांना आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करवून देण्याच्या धोरणाला अनुसरूनआघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ‘वी’ ने महाराष्ट्रात तृतीय श्रेणी शहरांमध्ये नवीन फॉरमॅटमधील जवळपास ३० ‘वी’ शॉप्स सुरु केली आहेत. रिटेल विस्ताराचा वेग वाढवत ‘वी’ ने औसाउमरेदकारंजा लाडपाटणअंबेजोगाई आणि रेवदंडा यासारख्या शहरांमध्ये ‘वी’ शॉप्स सुरु केली आहेत.

स्थानिक ग्राहकांना एकसमान पद्धतीचा ‘वी’ अनुभव मिळावाआवश्यक त्या सेवासुविधा तात्काळ मिळवता याव्यात या उद्देशाने गेल्या तीन महिन्यात ही ‘वी’ शॉप्स सुरु करण्यात आली आहेत. आधुनिक डिझाईनचीनवीन फॉरमॅटमधील ‘वी’ शॉप्समध्ये शहरी भागांमध्ये सध्या असलेल्या ‘वी’ स्टोर्सची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये अंतर्भूत करण्यात आली आहेत. ‘वी’ शॉप्समध्ये ‘वी’ ची सर्व प्रीपेड उत्पादने आणि सेवा उपलब्ध आहेत. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला प्रगत अनुभव व ब्रँडसोबत अधिक जास्त जवळीक व संपर्काचा लाभ मिळवता येतो.

या रिटेल विस्तार उपक्रमामागील धोरणात्मक उद्देश अधोरेखित करताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे सीओओ श्री. अभिजित किशोर यांनी सांगितले, “आमचा आजवरचा अनुभव आणि ग्राहक संशोधनातून असे निदर्शनास आले आहे कीमहानगरांच्या बाहेर एक खूप मोठा ग्राहकवर्ग आहे ज्यांना समोरासमोरव्यक्तिशः संपर्काच्या माध्यमातून सेवासुविधा मिळवणे अधिक जास्त सोपे वाटते. ग्रामीण भागातील विशाल लोकसंख्येने डिजिटल क्रांतीमध्ये सहभागी व्हावे यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही सर्व वेगवेगळ्या छोट्या शहरांमध्ये व तृतीय श्रेणी बाजारपेठांमध्ये ‘वी’ शॉप्सची संकल्पना आणून आमच्या ग्रामीण रिटेल धोरणामध्ये एक नवीन दृष्टिकोन आणला आहे. इतक्या कमी कालावधीत जवळपास ११०० ‘वी’ शॉप्स सुरु करणे हा आपल्या देशातील एक सर्वाधिक वेगवान रिटेल विस्तार आहे. यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांच्या अधिक जवळ पोहोचू शकूत्यांना आमची उत्पादने व सेवा अधिक सहजपणे मिळवता येतीलप्रशिक्षित कर्मचारी आणि आपलेसे वाटणारेआरामदायी रिटेल वातावरण यांचा लाभ मिळवता येईल.”  

Leave a Reply

%d bloggers like this: