Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !!

पुणे : क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘अनिकेत वर्टी करंडक’ टवे्न्टी-२० अजिंक्यपद १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट मैदान (ब्रिलीयन्टस् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) येथे झालेल्या स्पर्धेत अर्जुन देशमुख याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा पराभव करून विजेतेपद मिळवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा डाव ७७ धावांवर गडगडला. विहान सुतार (१४ धावा) आणि अमन सिंग (१५ धावा) केवळ या फलंदाजांनी दोन अंकी धावा केल्या. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या अर्जुन देशमुख याने १८ धावात ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली. अर्जुन डोंगरे (२-७) यानेही दुसर्‍या बाजुने उत्तम साथ दिली. हे आव्हान व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १४ षटकामध्ये व ४ गडी गमावून पूर्ण केले. श्रवण राठोड याने ३३ धावा तर, अर्जुन गायकवाड याने १५ धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्लेफेअरचे कार्यकारी संचालक अनिकेव वर्टी, उक्षेजक रमेश पाटील, कोटक बँकेचे उपाध्यक्ष बिक्रमजीत सेन, जे. अँड के. स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचे डॉ. रौफ फाफिक, क्रिक चॅलेंजर्सचे संचालक नितीन सामल आणि नंदकिशोर कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि ५१ हजार रूपये तर, उपविजेत्या परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि २५ हजार रूपये देण्यात आले. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज श्रेय असलेकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्जुन डोंगरे, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक झिदान मांगा, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पियुश अल्तेकर, उदयोन्मुख खेळाडू रितम सेन अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
परंडवाल क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २६.५ षटकात १० गडी बाद ७७ धावा (विहान सुतार १४, अमन सिंग १५, अर्जुन देशमुख ३-१८, अर्जुन डोंगरे २-७) पराभूत वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १४ षटकात ४ गडी बाद ७८ धावा (श्रवण राठोड ३३, अर्जुन गायकवाड १५, अमन सिंग ३-१२); सामनावीरः अर्जुन देशमुख.

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू-पियुश अल्तेकर;
सर्वोत्कृष्ट फलंदाज-श्रेय असलेकर;
सर्वोत्कृष्ट गोलंदाज-अर्जुन डोंगरे;
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-झिदान मांगा;
उदयोन्मुख खेळाडू-रितम सेन.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading