केंद्रीय अर्थसंकल्प हा महिलांसाठी खुशी कम और जादा गम – रुपाली चाकणकर
अमृत काळातील ७ सप्तर्षीचा उल्लेख अस म्हणत ७ मुद्दयांवर हा अर्थसंकल्प आहे असे सांगितले गेले. पण ज्या महिला मतदारांच्या जोरावर हे सरकार आले आहे त्या महिलांचा या ७ मुद्दयात उल्लेख देखील नव्हता हे दुदैव आहे.
- आज सादर झालेला अर्थसंकल्प हा २०२४ च्या निवडणुकांना डोळयासमोर ठेवून सादर केला गेला आहे.
- यात फक्त मोठ्या घोषणा आहेत. आज सकाळीच CNG स्वस्त केला आहे. हे सगळ आगामी निवडणुकांसाठीच आहे.
मध्यम वर्गाला, कर भरणाऱ्या नोकरदार वर्गाला डोळयासमोर ठेवून Tax Slab मध्ये बदल केले गेले आहेत पण Old & New
Regime अशा शब्दांचा गोंधळ घालत फक्त घोषणा केल्या आहेत.
- स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना अशी घोषणा केली गेली आहे यात दोन लाखाची गुंतवणुक केल्यास वार्षिक ७.५०% व्याज महिलांना देण्यात येणार आहे.
- याबाबत मला विचारायचे आहे की, किती महिला स्वतः निर्णय घेवून वर्षाला दोन लाख गुंतवू शकतात ? वर्षाला दोन लाख म्हणजे दर महिन्याला साधारण सतरा हजार होतात एवढी गुंतवणूक करु शकणाऱ्या महिला किती आहेत ? फक्त लोकप्रिय, मोठ्या घोषणांना अर्थ नाही.
- दिनदयाल अंत्यादय योजनेत ग्रामीण भागात ८१ लाख बचत गट केल्याचे सांगितले पण या महिलांना ठोस अर्थसहाय्य देण्याबाबत काही घोषणा झालेली नाही.
- कोविडचा भयंकर काळ आता आपण मागे सोडला आहे. आता एकल महिला, त्यांचा रोजगार असे प्रश्न समोर आहेत पण याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही.बचत गटाचा सक्षमीकरणचा आणि महिला सुरक्षेसाठी बजेटमध्ये उल्लेख नाही.
- या अर्थसंकल्पात रोजगाराचा काहीही उल्लेख नाही याआधी दरवर्षी २ कोटी रोजगार द्यायच्या घोषणा केल्या गेल्या त्याचे काय झाले ते आपण पाहतोच आहे.
– रुपाली चाकणकर
