मोदींचा विकास भरकटला…! संतोष शिंदे
महागाई प्रचंड वाढली आहे, परंतु महागाई बद्दल अर्थसंकल्पात चकार शब्द काढला गेला नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे काय…? परदेशातील काळा पैसा भारतात कधी येणार. सर्वसामान्य माणूस उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम शेतकरी विरोधी नेते प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमालाला दीडपट भावाचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. अर्थसंकल्पात याबाबत पाळलेले मौन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे असल्याची आहे. हा अर्थ संकल्प कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे आहे. धर्माच्या नावावर जातीवाद पसरवण्याचं एकमुखी कार्य मोदी सरकार करत आहे, त्यात तरुण पिढी गुरफटून जाऊन विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. मोदी सरकारच्या काळात विकास भरकटला असंच म्हणावं लागेल. GDP ची अवस्था पहा.
2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेला दिलासा हास्यास्पद वाटतो. भांडवलदार जोरात आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर व सामान्य माणूस कोमात…!
- संतोष शिंदे, प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
