वाफगाव किल्ल्यातील अतिक्रमण काढून किल्ल्याचे जतन करावे… – संभाजी ब्रिगेड
पुणे – राजमाता अहिल्याराणी होळकर, मल्हारराव होळकर व महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कर्तृत्वाचा इतिहास महाराष्ट्राला अभिमान व आदर्श वाटणारा आहे. इतिहास घडवला मावळ्यांनी परंतु तो जतन केला नाही, लिहिला नाही म्हणून आज गडकल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. ऐतिहासिक साधन, संदर्भ हे नष्ट झालेले आहे. म्हणून इतिहास तोडून मोडून वापरून इतिहासाचे विकृतीकरण होत आहे. म्हणूनच इतिहास आणि ऐतिहासिक वास्तू याचे जतन झाले पाहिजे. वाफगाव किल्ल्यातील अतिक्रमण काढून सरकारने किल्ल्याचे जतन करावे… अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर एकमेव अद्वितीय योद्धा म्हणून राज्याभिषेक महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक वाफगाव किल्ल्यामध्ये झाला. याच किल्ल्यामध्ये नंतर मल्हारराव होळकर किंवा राजमाता अहिल्या राणी होळकर सुद्धा वेगवेगळ्या मोहिमेमध्ये याच ठिकाणी वास्तव्य करत असायच्या. होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज सरकार च्या दुर्लक्षपणामुळे अत्यंत दुर्लक्षित झालेले आहे. वाफागाव किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि संरक्षण नसल्यामुळे किल्ल्याची अंतर्गत अवस्था, प्रचंड पडझड झालेली आहे. स्थानिक लोकांनी अतिक्रमण करून किल्ल्याच्या आत व बाहेर प्रचंड विद्रूपीकरण करण्यात आलेला आहे. वाफगाव किल्ल्याकडे कुणाचेही लक्ष नाही. म्हणून मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री मंडळाने विशेष लक्ष देऊन या किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि दुरुस्ती केली पाहिजे. अतिक्रमण हटवले पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे… पुणे जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांच्याकडे देण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी महोदय, दि. 06 जानेवारी रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा प्रशासनाच्या वतीने यापुढे साजरा करण्यात यावा ही आहे. तसेच यामागणीचे आदेश शासकीय स्तरावर संबंधित तहसीलदार व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत अशी वजा आहे. वाफदेव किल्ला पुणे जिल्ह्याचे वैभव आहे, तो संरक्षित करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे. वाफगाव किल्ल्याची तात्काळ देखभाल दुरुस्ती आणि संरक्षण करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, प्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक चंद्रकांत हजारे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, सह संघटक महेश अहिरे आदी उपस्थित होते.