fbpx

पुना क्लब, गेम चेंजर्स संघांची विजयी घौडदौड; गेम चेंजर्सच्या देवदत्त नातू याची १११ धावांची खेळी !!

दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब संघाने स्पर्धेत चौथा विजय तर, द गेम चेंजर्स संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत तिसरा विजय मिळवला.

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर बिरवाडकर याच्या नाबाद ६० धावांच्या जोरावर पुना क्लबने पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ५ गडी राखून सहज पराभव केला. पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना १४५ धावा धावफलकावर लावल्या. वरूण गुजर (४६ धावा) आणि अभिमन्यु जाधव (४० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. पुना क्लबने हे आव्हान १६.५ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. सागर बिरवाडकर याने नाबाद ६० धावांची तर, अकिब शेख याने ४४ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.

देवदत्त नातूच्या १११ धावांच्या खेळीच्या जोरावर द गेम चेंजर्स संघाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा १७१ धावांनी एकतर्फी पराभव केला. द गेम चेंजर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२० धावांचा डोंगर उभा केला. देवदत्त नातू याने ६२ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह १११ धावांची खेळी केली. सुरज शिंदे याने ७६ धावा करून देवदत्त याला सुरेख साथ दिली. या दोघांनी ७८ चेंडूत १५० धावांची सलामी देत जोरदार सुरूवात केली. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा डाव ४९ धावांवर गडगडला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ६ गडी बाद १४५ धावा (वरूण गुजर ४६, अभिमन्यु जाधव ४०, प्रणय सिंग ३-३८, ओंकार आखाडा २-२३) पराभूत वि. पुना क्लबः १६.५ षटकात ५ गडी बाद १४९ धावा (सागर बिरवाडकर नाबाद ६० (३२, ६ चौकार, ४ षटकार), अकिब शेख ४४ (२७, ५ चौकार, २ षटकार), किर्तीराज वाडेकर १-१५); सामनावीरः सागर बिरवाडकर;

द गेम चेंजर्सः २० षटकात ४ गडी बाद २२० धावा (देवदत्त नातू १११ (६२, १७ चौकार, ३ षटकार), सुरज शिंदे ७६ (३९, ४ चौकार, ८ षटकार);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी देवदत्त आणि सुरज यांच्यात १५० (७८) वि.वि. क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाण्सः १५ षटकात १० गडी बाद ४९ धावा (समीर मोमीन २३, हितेश वाळुंज ३-१२, अतिफ सय्यद २-२, देवदत्त नातू २-१०); सामनावीरः देवदत्त नातू;

Leave a Reply

%d bloggers like this: