जबाबदार पुढा-यांना हे शोभत नाही – संभाजीराजेचा अजित पवारांना टोला
कोल्हापूर : अजित पवार म्हणतात संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. मात्र संभाजीराजे धर्मवीर आहेत याचे अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुस्तकाचे वाचन करून ते फक्त स्वराज्य रक्षक म्हटले हे सांगावे. अजित पवार अर्धसत्य बोलले, असा म्हणत त्यांनी माहिती घेवून बोलावं असं संभाजीराजे छत्रपती यांनी ठणकावल आहे. तसेच जबाबदार पुढा-यांना हे शोभत नाही, असा टोलाही लगावला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांना धर्मरक्षक म्हणू नये, असे वक्तव्य केले होते. त्यावरून पुन्हा एकदा भाजपने राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी ‘ऐतिहासिक संदर्भ देताना पुस्तके वाचून द्यावे, असे म्हंटले आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याला संरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी यांनी त्याचे रक्षण केले म्हणून छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक आहेत हे निश्चित आहे. तसंच संभाजी महाराजांनी धर्माचे सुद्धा रक्षण केले हे कोणीही नाकारत नाही. म्हणून संभाजीराजेंना धर्मरक्षक सुद्धा आहे, हे म्हटले तर चुकीचे नाही.
आमदार जे सभागृहामध्ये बोलतात त्यामुळे ते अधिकृत असते मात्र तिथे अभ्यासपूर्ण बोलणे गरजेचे आहे. सगळ्या पुढा-यांनी आताचा कालखंड बघून ३०० वर्षे मागची उदाहरणे देणे चुकीचे आहे. आपल्याकडे मोठा इतिहास आहे मात्र विकृत बोलून वाद निर्माण केले जातात.
