राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाचा हात
गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठातील शैक्षणिक विभागांना मदतीचा हात देऊ केला असून विद्यापीठाच्या ‘गुणवत्ता सुधार योजने’अंतर्गत विद्यापीठाने विभागांना आर्थिक मदत देऊ केली आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना करण्यात आले आहे.
या संदर्भात विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागातर्फे विद्यापीठाच्या सर्व विभागांना या उपक्रमासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर काम केले जात असून विद्यापीठाकडून देखील यासाठी पुढाकार घेत प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
‘गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून देणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव सार्वजनिक विद्यापीठ आहे. आतापर्यंत अनेक महाविद्यालयांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याबाबतची आधी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.