fbpx

अर्जुन डांगळे यांची 1 जानेवारीला भिमा कोरेगाव येथे जाहीर सभा

भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त 1 जानेवारीला शैलेंद्र मोरे यांच्या नेतृत्त्वात डॉ.बाबसाहेब आंबेडकर पुतळा ते विजय स्तंभ दुचाकी रॅली –
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ,अभ्यासक अर्जुन डांगळे यांची भव्य जाहीर सभा भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भिमा कोरेगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती या सभेचे मुख्य संयोजक रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी आज दिली .
गेली दोन वर्ष करोनामुळे येथे जाहीर सभा घेण्यास आणि गर्दीस बंदी होती .दोन वर्षानंतर पहिल्यांदा पूर्ण देशभरातून भिमा कोरेगाव येथे लाखो कार्यकर्ते व महिला येणार आहेत .अर्जुन डांगळे यांच्या सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याचेही मोरे यांनी यावेळी सांगितले . तसेच सुप्रसिध्द व्याख्याते सचिन तायडे ही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत .शिवाय यावेळी आशितोष भोसले ,सिद्धार्थ मोरे यावेळी उपस्थित राहणार आहेत .यावेळी लोकप्रिय भीम गीतांचा संगीत कार्यक्रम ही होणार आहे .तरी पुणे शहर,जिल्हा व पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आवाहन शैलेंद्र मोरे यांनी केले आहे .तसेच करणी सेनेचे अध्यक्ष अजय सेंगर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रिप ब्लिकन जनशक्तीच्या वतीने तीव्र निषेध केला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई. करण्याची मागणी पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी दिली .

Leave a Reply

%d bloggers like this: