fbpx
Monday, September 25, 2023
BusinessLatest News

होनासा कन्ज्युमर लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

पुणे : ममाअर्थ या लोकप्रिय ब्रँडची मालक कंपनी आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये संचालनातून मिळालेल्या महसूलानुसार (स्रोत: रेडसीर रिपोर्ट) भारतातील सर्वात मोठीडिजिटलला प्राधान्य देणारी ब्युटी व पर्सनल केयर कंपनी होनासा कन्ज्युमर लिमिटेडने बाजारपेठ नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आपले ड्राफ्ट रेड हेररिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे.

आयपीओमार्फत इक्विटी समभागांच्या ऑफरमार्फत फंड्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.  या ऑफरमध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंत नव्याने जारी केलेले इक्विटी शेअर्स आणि समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करणाऱ्या समभागधारकांकडून ४,६८,१९,६३५ पर्यंत इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.

नव्याने जारी करण्यात येणार असलेल्या समभागांच्या विक्रीतून उभारली जाणारी रक्कम पुढील कारणांसाठी वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे – (१) ब्रँड्सविषयी जागरूकता वाढावीब्रँड जास्तीत जास्त लोकांच्या नजरेस पडावा यासाठी जाहिरातींवर खर्च १८६ कोटी रुपये (२) नवीन ईबीओ उभारण्यासाठी भांडवली खर्च ३४.२३ कोटी रुपये आणि (३) नवीन सलोन्स उभारणीसाठी भाबानी ब्लन्ट हेअरड्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीमध्ये गुंतवणूक २७.५२ कोटी रुपये आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे व अज्ञात इनऑरगॅनिक अधिग्रहण.

विक्रीसाठीच्या प्रस्तावामध्ये यांचा समावेश आहे – वरुण अलघ यांच्याकडून ३१,८६,३०० पर्यंत इक्विटी समभाग आणि गज़ल अलघ यांच्याकडून १,००,००० पर्यंत इक्विटी समभाग (समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करत असलेले प्रमोटर)सेल ईमार्फत गुंतवणूक करण्यात आलेले २,२०,६१३ पर्यंत इक्विटी समभाग इवोल्वन्स इंडिया कॉइनवेस्ट पीसीसी यांच्याकडूनइव्हॉल्व्हन्स इंडिया फंड III लिमिटेड यांच्याकडून ८,६२,९८७ पर्यंत इक्विटी शेअर्सफायरसाईड व्हेंचर्स इन्व्हेस्टमेंट फंड – कडून ७९,७२,४७८ पर्यंत इक्विटी शेअर्ससोफिना व्हेंचर्स एस ए कडून १,९१,३३,९४८ पर्यंत इक्विटी शेअर्स आणि स्टिलरीस व्हेंचर पार्टनर्स इंडियाकडून १,२७,५५,९६५ पर्यंत इक्विटी शेअर्सकुणाल बहल यांच्याकडून ७,७७,६७२ पर्यंत इक्विटी शेअर्सरिषभ हर्ष मारीवाला यांच्याकडून ४,७७,३०० पर्यंत इक्विटी शेअर्सरोहित कुमार बन्सल यांच्याकडून ७,७७,६७२ पर्यंत इक्विटी शेअर्स आणि इतर विक्री करणाऱ्या समभागधारकांचे इक्विटी समभाग.

रेड हेररिंग प्रॉस्पेक्टसमार्फत विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येणार असलेले इक्विटी समभाग हे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेडसिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडजेएम फायनान्शियल लिमिटेड आणि जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: