fbpx

उद्योगमंत्री उदय सामंत यांची हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी विक्रमी कामगिरी

नागपूर  : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक १९ डिसेंबर २०२२ ते दिनांक ३० डिसेंबर २०२२ दरम्यान नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी – रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी विक्रमी कामगिरी केली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत १०६ तर विधानपरिषदेत ४३ लक्षवेधी मांडण्यात आल्या. यामध्ये श्री.सामंत यांनी विधानसभेत ३० लक्षवेधी तर विधानपरिषदेत ७ लक्षवेधींना उत्तरे दिले. विशेषतः सामंत यांची अधिवेशन काळामध्ये सभागृहातील उपस्थिती सर्वाधिक होती.

शिंदे – फडणवीस सरकारमधील एक तरुण मंत्री म्हणून त्यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी अत्यंत चांगल्याप्रकारे पार पाडली असून सर्व स्तरातून त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले जात आहेत. श्री.सामंत यांनी लक्षवेधींना तर उत्तरे दिलीच त्याचप्रमाणे विधानसभा आणि विधानपरिषदेत अनुक्रमे ७ आणि ४ प्रश्नांना उत्तरे दिली.

श्री.सामंत यांनी ट्विट करीत आपल्या अधिवेशन काळातील कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. विशेषतः सभागृहात कामकाजादरम्यान सहकार्य करणाऱ्या सर्व सहकार्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: