fbpx

इझमायट्रिपकडून भागधारकांसाठी स्पेशल प्रोग्राम ईएमटीफॅमिली लॉन्च

मुंबई : इझमायट्रिप या भारतातील अग्रगण्य ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने आज त्यांच्या उच्चभ्रू भागधारकांसाठी इन्वाइट ओन्ली, स्पेशल प्रोग्राम ईएमटीफॅमिलीच्या (EMTFAMILY) लॉन्चची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत इझमायट्रिपचे भागधारक ‘रिफर नाऊ अॅण्ड अर्न फॉरेव्हर’ उपक्रमामध्ये नोंदणी करू शकतात. रिफररला इझमायट्रिप वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लीकेशनवर बुकिंग करण्यासाठी नवीन युजरला रिफर केल्‍यास एक वर्षासाठी फ्लाइट्स, हॉटेल्स, हॉलिडेज, बसेस व रेल्वे बुकिंग्जवर आकर्षक कॅश-बॅक्स मिळतील.

लाभ देण्यासाठी ब्रॅण्ड आपल्या भागधारकांच्या विशेष समूहाला ईएमटीफॅमिलीची आकर्षक संधी देते, ज्यामध्ये उत्तम सूट, रिफरल योजना व विविध ऑफर्स मिळतात, ज्या लाभ घेण्यासाठी वाढवण्यात आल्या आहेत. भागधारक कूपन कोड: ईएमटीफॅमिलीचा वापर करू शकतात आणि विशेष लाभांचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या पॅन कार्ड नंबरचा उल्लेख करू शकतात.

इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्या बहुमूल्य भागधारकांच्या समूहासाठी आमचे सर्वोत्तम उत्पादन लॉन्च करण्याचा आनंद होत आहे. आम्हाला या उत्पादनाचे लाभ निदर्शनास आले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की, हे उत्पादन आमच्या भागधारकांसाठी लाभदायी ठरेल. कंपनीवर विश्वास दाखवण्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आम्ही आतापर्यंत आमच्या प्रवासाचा भाग असण्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि विशेष ऑफर्स व सूटसह त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यास उत्सुक आहोत, तसेच आम्ही जगभरातील लाखो भागधारकांना सेवा देत राहू.’’

ईएमटीफॅमिलीची विशेष वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

 रिफर नाऊ अॅण्ड अर्न फॉरेव्हर.

 विविध फ्लाइट्स व हॉटेल्सवर स्पेशल व विशेष भाडेदर.

 ५०० हून अधिक हॉटेल्समध्ये २ नाइट्ससाठी स्टेची निवड करा आणि १ मोफत मिळवा.

 वैद्यकीय आपत्ती स्थितीमध्ये संपूर्ण रिफंड.

 प्रत्येक व्यवहारावर अनेक ब्रॅण्ड्सकडून ५००० रूपयांचे वाऊचर्स.

 हॉटेल बुकिंग्जवर जवळपास १२ टक्क्यांची अतिरिक्त सूट.

 बस व रेल्वे बुकिंग्जवर जवळपास ७ टक्क्यांची अतिरिक्त सूट.

 देशांतर्गत फ्लाइटवर ५०० रूपयांची अतिरिक्त सूट आणि आंतरराष्‍ट्रीय फ्लाइटवर १००० रूपयांची सूट.

Leave a Reply

%d bloggers like this: