fbpx

अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा : आद्य, कृष्णा, अनन्या अंतिम फेरीत दाखल

पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत आद्य पारसनीस, कृष्णा जसूजा, अनन्या गाडगीळ, ओजल रजक यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित आद्य पारसनीसने क्रिश खटवडला १५-११, १५-१२ असे नमविले. आता आद्यची विजेतेपदासाठी कृष्णा जसूजाविरुद्ध लढत होईल. दुसऱ्या उपांत्य लढतीत कृष्णाने अग्रमानांकित सार्थक पाटणकरला १५-११, ८-१५, १६-१४ असा पराभवाचा धक्का दिला. यानंतर १७ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित अनन्या गाडगीळने सानिका पाटणकरला १५-८, १५-५ असे, तर ओजल रजकने दुसऱ्या मानांकित आंचल जैनला १५-११, १५-७ असे नमविले.

निकाल : १५ वर्षांखालील मुले दुहेरी : उपांत्य फेरी : आदित्य शिंदे – सिद्धार्थ भोसले वि. वि. कृष्णनील गोरे-ओजस जोशी १५-१०, १५-९; कोणार्क इंचेकर-सार्थक पाटणकर वि. वि. ध्रुव निकम-ओजस सोरटे १५-१२, १५-९.

१५ वर्षांखालील मुली दुहेरी : उपांत्य फेरी : जुई जाधव-यशस्वी काळे वि. वि.आर्या कुलकर्णी -सुखदा लोकापुरे १५-६, १५-८; शरयू रांजणे-सोयरा शेलार वि. वि. भक्ती पाटील-नव्या रांका १७-१५, १५-११.

१७ वर्षांखालील मुले दुहेरी : उपांत्य फेरी : आद्य पारसनीस -कृष्णा जसूजा वि. वि. ऋषभ चोरडिया – स्पर्श दुआ १५-९, १५-१३; क्रिश खटवड-वेदांत सरदेशपांडे वि. वि. हर्षित सूर्यवंशी -वेदांत कुंडे १५-७, १५-४.

१७ वर्षांखालील मुली दुहेरी : उपांत्य फेरी : राधा पाठक-सुखदा लोकापुरे वि. वि. सिमरन डिंग्रा-सिया रासकर १५-११, ४-१५, १५-१२; अदिती गावडे-जिज्ञासा चौधरी वि. वि. शरयू रांजणे – सोयरा शेलार १५-८, १५-५.

१७ वर्षांखालील मिश्र दुहेरी : उपांत्य फेरी : व्यास खोंडे-सिमरन धिंग्रा वि. वि. आदित्य कदम-श्राव्या शिंदे १५-६, १५-३; श्लोक डागा-सिया रासकर वि. वि. ओजस जोशी वि. वि. अद्विका जोशी १६-१४, १५-११.

३५ वर्षांवरील पुरुष एकेरी : उपांत्य फेरी : आदित्य काळे वि. वि. स्वप्नील चौधरी १५-२, १५-३; जयंत पारिख वि. वि. आनंद साबू १५-११, १५-९.

महिला दुहेरी : उपांत्य फेरी : सोनिया तापकीर -योगिता साळवे वि. वि. खुशी सुवर्णा -सई नांदुरकर १५-१०, १५-१३; अदिती काळे-रिया कुंजिर वि. वि. अदिती रोडे- लीना ढापरे १५-१३, १५-१०.

मिश्र दुहेरी : उपांत्य फेरी : अजित कुंभार-रिया कुंजिर वि. वि. सोहन नावंदर – सारिका गोखले १५-७, १५-९; नरेंद्र पाटील-सानिया तापकीर वि. वि. नरेंद्र गोगावले – अदिती गायकवाड १५-११, १५-११.

Leave a Reply

%d bloggers like this: