fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

समानतेचा संदेश देत ‘ ख्रिसमस संध्या’ उत्साहात

पुणे : दरवर्षी साजरा होणारा  ख्रिसमस संध्या यंदा बालगोपाळांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही आनंदाची पर्वणी ठरली. समानतेचा संदेश देताना तिरंगी फुगे आकाशात सोडून  ‘ ख्रिसमस संध्या’ उत्साहात साजरा करण्यात आला.
निमित्त होते, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या माध्यमातून  दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या सर्वधर्मीय नागरिकांसमवेत  ख्रिसमस संध्या कार्यक्रमाचे. शिवदर्शन येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे अखिल भारतीय  काँग्रेस पक्षाच्या  वर्धापन  दिनानिमित्त  सर्वधर्मियांसमवेत  ख्रिसमस संध्या कार्यक्रम हजारो मुलामुलींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल , जेष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे,माजी नगरसेवक चंदू कदम, रफिक शेख, जया किराड, विक्रांत खन्ना, चेतन अगरवाल, गौरव बोराटे प्रकाश आरने, दीपक ओव्हाळ, विश्वास दिघे, पुणे नवरात्रौ  महोत्सवाचे पदाधिकारी नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयोजक  पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष   व माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, आज देशात सर्वधर्मसमभाव  जो आहे तो , केवळ काँग्रेस पक्षामुळेच आहे आणि काँग्रेस पक्षाची ही शिकवणूक आहे. त्यामुळे गेली २२ वर्षे हा उपक्रम साजरा केला जातो. यंदा २३ वे वर्ष ख्रिसमस संध्याचे असून काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध लोकोपयोगी योजना यापूर्वी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात.
ख्रिसमस संध्यानिमित्त यावेळी उपस्थित बालचमूंना रोज आई-वडिलांची सेवा आणि देशाचे रक्षण करण्याची शक्ती देवदूताकडे करण्यासाठी शपथ देण्यात आली.  सूत्र संचालन अमित बागुल यांनी केले. सांताक्लॉजच्या हस्ते भेटवस्तू स्वीकारत ,खाद्य पदार्थांचा आस्वाद यावेळी बालचमूंनी घेतला.संगीत, नृत्य,जादूचे प्रयोग, कॅमल राईड आदी विविध कार्यक्रमांचाही बालचमूंनी मनमुराद आनंद लुटला.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर बागुल, सागर आरोळे, महेश ढवळे, हेमंत बागुल,अभिषेक बागुल ,इम्तियाज तांबोळी, बाबासाहेब पोळके, संतोष पवार, समीर शिंदे, गणेश खांडरे,संदीप सिद्धे, पप्पू देवकर, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d