fbpx

डायलिसिससाठी महिलेला युवसेनेची मदत

पुणे – पालिकेकडून रुग्णालयांना मिळणारा निधी मिळणे बंद झाल्यामुळे डायलिसिससाठी पैसे शिल्लक नसलेल्या माधुरी विसवे यांच्या मदतीला पुणे शहर युवासेना धावून गेली आहे. शिवसेना नाना पेठ मुख्य शाखेच्या वतीने त्यांना मदत म्हणून १ महिन्याचे डायलिसिसचे सर्व साहित्य आणि १ महिन्याची संपूर्ण औषधे देण्यात आली.

युवासेना समन्वयक युवराज रामभाऊ पारीख, शिवसेना पुणे शहर संघटक राजेंद्र शिळीमकर, युवासेनाचे शहर अधिकारी राम थरकुडे, सनी गवते, परेश खांडके, गौरव पापळ, दक्षेश कुरपे, ऋषभ नानावटी, हर्षट बिबवे, अक्षय बद्रे, रोहित शिवसरण, विशाल बोझे, नीलेश जगताप, शुभम दुगाणे, रमेश क्षीरसागर, अभिजित ताठे, प्रवीण रासकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: