fbpx

काँग्रेस भवन येथे शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पुणे : येत्या २८ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ वा वर्धापन दिन संपन्न होणार आहे. या दिनाचे औचित्य साधून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा ह्या हेतूने मराठी/हिंदी/इंग्रजी या भाषांमध्ये वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या संकल्पनेतून काँग्रेस भवन, शिवाजीनगर पुणे येथे करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर कमलताई व्यवहारे यांच्या हस्ते झाले. सदर स्पर्धेमध्ये इ. ८ वी ते इ. १० वी व इ. ११ वी ते इ. १२ वी ह्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वत्कृत्व स्पर्धेमध्ये महात्मा गांधी एक वैचारिक नेतृत्व, भारतीय संगणक क्रांतीचे जनक, भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे हे विषय देण्यात आले होते. तसेच ५ क्रमांकाना आकर्षक बक्षीसे (एज्युकेशनल टॅब, सायकल, स्मॉट वॉच, हेड फोन इ.) देण्यात आली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. इ. ८ वी ते इ. १० वी मध्ये साफिया शेख हिस प्रथम क्रमांक, श्रावणी संकपाल हिस द्वितीय क्रमांक, मारियम पटेल हिस तृतीय क्रमांक, सृष्टी पांड्ये हिस चतुर्थ क्रमांक, पराग ओक याचा पाचवा क्रमांक आला तर स्नेहा ओंबासे, उत्कर्षा रणपिसे, आदिराज सोनवणे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविले. इ. ११ वी ते इ. १२ वी या गटामध्ये रणवीर डोंगरे याने प्रथम क्रमांक, श्रावणी नेटके हिने द्वितीय क्रमांक तर अर्णव पाटोळे याने उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविले.

कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेविका नीता रजपूत यांनी केले होते. यावेळी रफिक शेख, सुनील शिंदे, अजित दरेकर, फैय्याज शेख, द. स. पोळेकर, मेहबूब नदाफ, सीमा सावंत, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, गुलाम खान, विक्की खन्ना, सौरभ अमराळे, सुजित यादव, दिपक निनारिया, संतोष पाटोळे, लतेंद्र भिंगारे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: