Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

डॉ. नीलम गोऱ्हेनी घेतली लोकसभा अध्यक्षांची पुण्यात सदिच्छा भेट

पुणे: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात राजभवन येथे लोकसभा अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाशजी बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुरू असलेल्या संसदीय कार्याविषयी माहिती दिली. अधिवेशनातील विधेयके, विविध विषय आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ कामाबाबत माहिती दिली. अधिवेशन काळातील पुढील कामाबाबत श्री. बिर्ला यांचे मार्गदर्शन घेतले. डॅा.गोर्हेनी त्यांचे महावस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी परिवर्तन संस्थेचे डॉ. शैलेश गुजर उपस्थित होते..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading