fbpx

आमदार जयकुमार गोरे अपघात : घातपाताची शक्यता नाही -खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर

पुणे : साताऱ्यातील माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांची गाडी पुलावरुन ५० फूटांहून अधिक खोल नदीत कोसळल्याने जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान जयकुमार गोरेंचे वडील भगवान गोरे यांनी लेकासोबत घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. यावर माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना घातपाताची शक्यता फेटाळून लावत अपघाताच्या कारणाचा अंदाज व्यक्त केला.
जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या शंकेबद्दल खासदार निंबाळकर यांनी मोठा खुलासा केला आहे. जयकुमार गोरे यांचा अपघातच झाला असावा, कोणताही घातपात नाही. मी थोड्या वेळापूर्वी आमदार गोरेंच्या वडिलांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली मला घातपाताची सुतराम शक्यता वाटत नाही.
अपघातानंतर जयकुमार यांचा कार चालक कॉन्शियस होता, त्याला झोप लागल्याच्या पलिकडे काही निदर्शनास आलं नाही. ड्रायव्हर शुद्धीवर आल्यावर त्याचे स्टेटमेंट देईल, पण आज तरी मी खात्रीशीर सांगू शकतो की पहाटेच्या डुलकीमुळे हा अपघात झालाय, असं खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. जयकुमार गोरे यांची प्रकृती उत्तम असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: