fbpx

भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार ; महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला

नागपूर  – घेतले खोके, भूखंड ओके… दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो… बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो… भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री…गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला.

महाविकास आघाडीच्या आमदारांनी भूखंडाचा श्रीखंड वाटून मिंधे सरकारचा निषेध केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: