Friday, October 23, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, वैचारिक विकास व्हावा – सुजाता हलवाई

पुणे : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, वैचारिक विकास व्हावा म्हणून सुजाता हलवाई व एस. सी. मास संस्थेच्यावतीने ७ व्या राष्ट्रीय स्थरावरील स्पर्धा परीक्षेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. भारतातील हजारोंच्या संख्येने यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही परीक्षा वैदिक गणित, आकडेमोड, गणित प्रतिभा या विषयांवर आधारित होती. सदरील परीक्षेत ५० विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. व त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

कल्पेश सोनजे, अधिराज शिर्क्के, काव्या गिरमे, विराज किटड, रेट्टी मिश्रा या ५ विध्यार्थ्यांना सर्वोच्च गुण मिळाले. या विद्यार्थ्यांना सायकल हे बक्षीस अभिनेत्री शर्वरी जेमनिस, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप देशमाने, एस. सी. मास संस्थेच्या संचालिका सुजाता हलवाई यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी जे. एस. पी. एम.चे एस. आर. थिटे, मिसेस इंटरनॅशनल हेमा तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना सुजाता हलवाई म्हणाल्या की गणिताची भीती कशी घालवावी. हे सोप्या पद्धतीने कसे करावे, हे तंत्राद्वारे प्रात्याक्षिके करून दाखवण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या की सदरील परिक्षा जे. एस. पी. एम. संस्थेच्या प्रारंगणात पार पडली. २ हजार पेक्षा जास्त पालकांची उपस्थिती लावली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading