fbpx

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT चौकशी होणार

नागपूर : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केस सुरू आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे याचे पुरावे आहेत त्यांनी ते द्यावे. दिशा सालियन केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंह यांची केस सीबीआयकडे होती. नवीन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, दिशा सालियन हयात नसताना त्याबद्दल आणखी बोलून बदनाम करायचे नाही. तिच्या आई-वडिलांनी हात जोडून विनंती केली, आम्हाला आता जगू द्या, दिशाला बदनाम केले जात आहे. ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियनची चौकशी करायची असेल तर पूजा चव्हाणची देखील चौकशी करा. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. फक्त राजकारण करू नका. शिंदे गटाच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: