fbpx

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुणे : पुण्यातील कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून मुक्ता टिळक या कर्करोगाशी झूंज देत होत्या. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या लोकमान्य टिळकांच्या  पणतसून आहेत. भाजपच्या पुण्यातील त्या पहिल्या महापौर होत्या. 

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले आहे. त्या भाजपच्या पहिल्या महापौर असल्याचीही माहिती आहे. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत. मुक्ता टिळक टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.

पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकलीय. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवलीय.

शिवाय, मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतलंय. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केलं आहे.

आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक १५ च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्यानंतर २०१७ साली त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या.

त्या महापौर असतानाच २०१९ साली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या.

Leave a Reply

%d bloggers like this: