परवडणाऱ्या किमतीतील ‘स्टे शुअर’ सॅनिटरी नॅपकिन्सना प्रतिसाद
महिला, मुलींसाठी चांगल्या दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन माफक किमतीत उपलब्ध व्हावेत यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. पुण्यातील निखिल अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघा भावांनीही या उपक्रमाला हातभार लावण्याच्या दृष्टीने उत्तम दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन अगदी माफक किमतीत उपलब्ध केले आहेत. इटर्निस हायजिन प्रॉडक्ट्स या आपल्या कंपनीद्वारे त्यांनी‘स्टे शुअर’या नावाने महिलांसाठी माफक किंमतीत सॅनिटरी नॅपकिन दाखल केले आहेत. त्यांच्या या उत्पादनाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण देशात त्यांनी परवडणाऱ्या किंमतीतील सॅनिटरी उत्पादने उपलब्ध केली आहेत.
याबाबत बोलताना निखिल अग्रवाल म्हणाले, “देशभरातील महिला, मुलींसाठी सहज उपलब्ध होणारे आणि परवडणाऱ्या किंमतीतील उच्च दर्जाचे उत्पादन बनवणे हे आमचे ध्येय होते. आम्ही उत्पादन सुरू केले.आम्हाला आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत ठाम विश्वास होता, मात्र ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात आम्ही कमी पडत होतो. त्यावेळी मीशो आमच्या मदतीला आहे. मिशो प्लॅटफॉर्मने आम्हाला केवळ जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत केली नाही, तर त्यांच्या शून्य-कमिशन धोरणामुळे आम्हाला सर्वांना परवडेल अशा किंमतीत आमचे उत्पादन देण्यास मदत झाली. वाढत्या प्रतिसादामुळे आम्हाला आमच्या उत्पादनांची श्रेणी ३८ वेगवेगळ्या उत्पादनांपर्यंत वाढवता आली असून आता आम्ही पॅन्टीलायनर्स दाखल करण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी सध्या बाजारपेठेचा अभ्यास केला जात आहे. ”