fbpx

मुळशी तालुक्यात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व.


पुणे:मुळशी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत थेट सरपंच निवडणूकीत तरूणाईची क्रेझ पाहायला मिळाली असून मतदारांनी तरूणांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिलेल्या आहेत.मतमोजणी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर बाजी मारली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केला आहे. ग्रामपंचायतसाठी मतदान झाले.तर पौड येथील सेनापती बापट सभागृहात मतमोजणी करण्यात आली.तहसिलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हि मतमोजणी पार पडली. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी परिसरात उमेदवार,प्रतिनिधी तसेच समर्थक यांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी नंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी गुलालाची उधळन करत जल्लोष केला.
गावे व विजयी सरपंचाचे नाव पुढीलप्रमाणे
दासवे : स्वाती नितीन मोरे
आडमाळ : पल्लवी हेमंत पासलकर
मोसे : रसवंता काळुराम पासलकर
पाथरशेत : सरपंच पद रिक्त
माळेगांव : नंदा नामदेव चौधरी
भोडे : राजेंद्र रामभाऊ मारणे

Leave a Reply

%d bloggers like this: