fbpx

आम आदमी पार्टी चा पुणे जिल्ह्यात प्रवेश!!

पुणे:गुजरात निवडणुकीनंतर नुकत्यातच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवलेल्या आम आदमी पार्टी ने आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव ग्रामपंचायत मध्ये आपले आम आदमी पार्टीचे तीन सदस्य निवडून आले आहेत. श्रीमती जया बनसोडे, शंकर चोरमले, ऋषिकेश देवकर हे सदस्य चांगल्या फरकाने निवडून आले आहेत. आपचे समर्थन असलेले सरपंच हे किरकोळ मतांनी पडले. परंतु यानिमित्ताने ग्रामीण भागात सुद्धा आम आदमी पार्टी प्रवेश करते आहे. ‘जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विषयीचा भ्रमनिरास आहे, त्यामुळे शहरी तोंडावळा असलेल्या आम आदमी पार्टीला यापुढे ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळेल.आपचे स्थानीक पदाधिकारी बाळासाहेब जगताप यांच्या प्रयत्नांना यश मिळाले’ अशी भावना जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली.
महत्त्वाचे म्हणजे आम आदमी पार्टीला यावेळेस कावळेवाडी उस्मानाबाद, कन्नड सारोळा गाव, नागपूर कामठी गाव, निलंगा राठोडा गाव, इत्यादी विदर्भ व मराठवाडा भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदावर आपचे समर्थन असलेले उमेदवार निवडून आले आहेत अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: