Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

मानवी हक्कांचे संरक्षण केवळ कायद्यातील तरतुदीने होणार नाही – प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर

पुणे : मानवी हक्कासाठी खूप महत्वपूर्ण कायदे असले, तरी मानवी हक्कांचे संरक्षण केवळ कायद्यात तरतुद आहे, म्हणून होणार नाही. त्यासाठी समाज हक्का बरोबरच कर्तव्याने देखील जागृत व्हायला हवा. यासाठी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था चांगले कार्य करीत आहे, असे मत जेष्ठ शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी व्यक्त केले.

मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, जाधवर ग्रुप, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या सभागृहात मानवाधिकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ लेखक नामदेव जाधव, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, मुंबई उच्च न्यायालयाच्या जेष्ठ विधिज्ञ गायत्री सिंग, ऍड. शार्दूल जाधवर, डॉ. यामिनी अडबे, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर आदी उपस्थित होते.

मानवाधिकार पुरस्कार विधी क्षेत्रात राजेंद्र अनभुले, सामाजिक क्षेत्रात अमृता करवंदे, सामाजिक ग्रामीण क्षेत्रात राजू केळकर, कला क्षेत्रात चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र बरकडे, शैक्षणिक क्षेत्रात संजय ढवळे, क्रीडा क्षेत्रात प्रशांत आबने यांना प्रदान करण्यात आले. तसेच विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार साहित्य क्षेत्रात दीपा देशमुख आणि बालहक्क कार्यकर्ते सुशांत आशा यांना सन्मानित करण्यात आले.

नामदेव जाधव म्हणाले, मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण मोबाईल व्यसनी बनला आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल आणि मानवी हक्कांचे संरक्षण करायचे असेल तर मोबाईल व्यसनमुक्ती चळवळ उभी करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त शशिकांत बरोटे यांनी ‘संघर्ष मानवी हक्कांचा’ या विकास कुचेकर व आकाश भोसले यांनी लेखन संकलन केलेल्या व शब्द वैभव प्रकाशनातून प्रिंट केलेल्या पुस्तकाचे कौतुक केले.तसेच संस्थेच्या कार्याला शुभेच्छाही दिल्या.

मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्य करीत असलेल्या मान्यवरांचा गौरव, सन्मानामागील भावना प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन संचालक अण्णा जोगदंड, अण्णा मंजुळे, अनिल कदम, आकाश भोसले, सोमनाथ सावंत, शकील शेख, नितीन काळे, संजना करंजावणे, रुपाली वाईकर, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी, विकाश शहाणे, नंदकुमार ढसाळ , परशुराम पाटील यांसह सभासद पदाधिकारी यांनी केले होते. प्रा. सचिन दुर्गाडे, अभिनेता सुभाष यादव, यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading