fbpx

महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणा-यांना धडा शिकवावाच लागेल – शरद पवार

मुंबई: महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणा-यांना धडा शिकवावाच लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चात विरोधकांचा समाचार घेतला. महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त वक्तव्य, कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातील बाहेर चाललेले उद्योग याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता.

महामोर्चात बोलताना शरद पवार म्हणाले, आज आपण महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्र आलो आहोत. छत्रपतींचे नाव लोकांच्या मनावर अखंड आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. देशात कोणत्याही राज्यात केलो तरी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे नाव आदराने घेतले जाते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना लवकरात लवकर हाकला. महाराजांचा अपमान करणा-यांना राज्यातून हाकला त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी पवारांनी केली. राज्यात असलेल्या सरकारमध्ये महाराष्ट्राची बदनामी करण्याची स्पर्धा सुरू असल्याची टीका सुरू असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: