fbpx

आदि बारडे, ध्रुव मोदी, रोहन बोरडे यांचे संघर्षपूर्ण विजय !!

पुणे : रविंद्र पांड्ये टेनिस अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सोलारीस करंडक’ अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (१४ वर्षाखालील) स्पर्धेत आदि बारडे, ध्रुव मोदी, रोहन बोरडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेत आगेकूच केली.

कोथरूड येथील सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये पुण्याच्या आदि बारडे याने प्रांजय कुतवळ याचा ९-८ (३) असा टायब्रेकमध्ये पराभव केला. संघर्षपूर्ण झालेल्या सामन्यात ध्रुव मोदी याने रतन कुबसाड याचा ९-८ (५) असा टायब्रेकमध्ये पराभव करून दुसर्‍या पात्रता फेरीत प्रवेश केला. रोहन बोरडे याने अविनाश सुतार याचा ९-७ असा पराभव केला.

आहान पाटील याने वेद परदेशी याचा ९-१ असा तर, प्रद्युम्न ताताचर याने अमोघ पाटील याचा ९-१ असा सारख्याच फरकाने पराभव केला. वेदांत झोपे याने अझलान शेख याचा ९-१ असा सहज पराभव केला. अर्जुन जांभाळे याने सिद्धार्थ डोंगरे याचा ९-४ असा पराभव केला. आदित्य गायकवाड याने अहान पाटील याचा ९-५ असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचे उद्धघाटन सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली आणि स्पर्धेचे संचालक रविंद्र पांड्ये यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा संक्षिप्त निकालः पात्रता फेरीः पहिली फेरीः
आहान पाटील वि.वि. वेद परदेशी ९-१; प्रद्युम्न ताताचर वि.वि. अमोघ पाटील ९-१;
वेदांत झोपे वि.वि. अझलान शेख ९-१; आदि बारडे वि.वि. प्रांजय कुतवळ ९-८ (३);
रोहन बोरडे वि.वि. अविनाश सुतार ९-७; ध्रुव मोदी वि.वि. रतन कुबसाड ९-८ (५);
अर्जुन जांभाळे वि.वि. सिद्धार्थ डोंगरे ९-४; आदित्य गायकवाड वि.वि. अहान पाटील ९-५;

Leave a Reply

%d bloggers like this: