fbpx

मेलोराने ‘द अवतार-इन्स्पायर्ड’ ज्वेलरी कलेक्शन लाँच केले

मुंबई : मेलोरा या वजनाने हलके व किफायशीर फॅशनबेल सोन्याचे दागिने सादर करणाऱ्या आघाडीच्या डी२सी ब्रॅण्डने आधुनिकतेला साजरे करण्यासाठी आणि ज्वेलरी क्षेत्रातील पर्यायी आकारमानांमधील ट्रेण्डला दाखवण्यासाठी अद्वितीय द अवतार-इन्स्पायर्ड ज्वेलरी कलेक्शन लाँच केले आहे. नवीन ज्वेलरी कलेक्शन अपरंपरागत, किमान व एलियन्सच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांनी प्रेरित आहे आणि हिरे व शेडेड ब्ल्यू एनामेलमध्ये निर्माण करण्यात आले आहे, ज्यामधून काल्पनिक विश्वाचा अनुभव मिळतो.

मेलोरा जागतिक फॅशन ट्रेण्ड्सवर बारकाईने लक्ष ठेवते आणि त्यांच्या कलेक्शनमधील प्रत्येक उत्पादन डिझाइन करण्यासाठी अथक मेहनत घेते. या लाँचसह मेलोराने दैनंदिन ज्वेलरीमध्ये विद्यमान ट्रेण्ड्सची भर करत आपल्या शिरपेच्यात आणखी एका तुऱ्याची भर केली आहे. त्यांच्या नवीन कलेक्शनमध्ये सामान्य, एलिनिस्ट, भौमितिक व आकर्षक डिझाइन्ससह पेंडण्ट्स, कानातले, बांगड्या व अंगठ्यांच्या व्यापक श्रेणीचा समावेश आहे. या कलेक्शनची किंमत १२,००० रूपयांपासून सुरू होते.

मेलोराच्या डिझाइनच्या वरिष्ठ उपाध्यक्ष दीपशिखा गुप्ता म्हणाल्या, “आम्हाला काम करायला आवडलेल्या अनेक साप्ताहिक लाँचपैकी एक आहे अवतार-इन्स्पायर्ड कलेक्शन. भावी फॅशन ट्रेण्ड हे अपारंपारिक किमान ज्वेलरी कलेक्शन निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरले. या कलेक्शनमध्ये हिरे व ब्ल्यू शेडेड एनामेल आहे. आमचा विश्वास आहे की, ग्राहक या नवीन कलेक्शनसाठी आमचे कौतुक करतील.’’

Leave a Reply

%d bloggers like this: