fbpx

सर्जिकल स्ट्राईकवर निवडणूका जिंकणाऱ्या मोदी सरकारला CDS सेनाप्रमुख जनरलबिपिन रावत यांचे विस्मरण – कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

पुणे : जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीची एक हाती सत्ता केंद्राकडे असताना फेब्रुवारी २०१९ मधे पुलवामा येथे (३५० किलो आरडीएक्स स्फोटात) सीआरपीएफ चे ४१ जवान मारले गेले. या दुर्दैवी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्याच्यि हेतुने मोदी सरकारने तात्कालिक सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत यांचे नेतृत्वाखाली बालकोट -उरी येथे सर्जिकल स्ट्राईक केला. देशप्रेमाचे व ४१ जवानांचे शहीदत्व या भावनिक वातावरणात २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या. नुकतेच जनरल बिपिन रावत यांक्या हेलिकॉप्टर अपघातास एक वर्ष पूर्ण झाले. परंतु अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. इतकेच नव्हे तर सर्जिक्ल स्ट्राईकवर लोकसभा जिंकणाऱ्या मोदी सरकारला जनरल बिपिन रावत यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे विस्मरण झाल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.

तिवारी म्हणाले, जनरल बिपीन रावात यांचा प्रथम स्मृतिदिन (१० डीसेंबर) काही लष्कर विभागात करण्यात आला. मात्र सर्जिक्ल स्ट्राईकवर लोकसभा जिंकणाऱ्या मोदी सरकार मात्र जनरल बिपिन रावत यांचा प्रथम स्मृतिदिनच सोईस्करपणे विसरले किमान त्यांचेविषयी ट्विटरवर देखील सरकारने भावना व्यक्त केल्याचे निदर्शनास आले नसल्याने याविषयी तीव्र खेद वाटतो.

पुलवामा येथील ‌अतिरेकी हल्ल्याबाबत राज्यपाल यांनी सुरक्षा यंत्रणेचे अपयश असल्याचे जाहीर सांगितले होते. मात्र अतिरेक्यांच्या दुर्दैवी हल्ला प्रकरणी व सुरक्षा यंत्रणा गहाळ प्रकरणी अजूनही कोणावर ठोस कारवाई झालेली नाही. हे देशाचे दुर्दैव आहे तेथील तात्कालीन उपअधिक्षक देविंदरसिंग यास दिल्ली येथे दोन‌ अतिरेक्यांच्या सोबत अटक केल्याचे वृत्त आहे. मात्र पुढे कारवाई विषयी अनभिज्ञताच आहे, असे कॉंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पुढे म्हंटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: