fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

जेव्हा चंद्रकांत पाटील बनतात शाळेचे शिक्षक…

पुणे:राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमीच लहान मुलांमध्ये रमून जातात. लहान मुलांशी संवाद साधताना, ते अतिशय आनंदी होतात. आजही त्यांचे एक वेगळे रुप सर्वांना पाहायला मिळाले. आज त्यांनी चक्क शाळेच्या शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थिनींना स्वच्छतेचे धडे दिले. तसेच सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थिनींचे पालकत्व स्वीकारले. तसेच एक पालक असलेल्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची घोषणा केली.

कोथरूड मधील कर्वेनगर भागातील जिव्हाळा फाऊंडेशन संचालित अनुराधा पूर्व माध्यमिक शाळा आणि स्व. सुरेश मुठे मुलींचे वसतिगृह सुमन बालसंस्कार केंद्राला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. पुण्याच्या ग्रामीण भागातील या शाळेत भटक्या विमुक्त जाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. तसेच या सर्व मुलीं शाळेच्या वसतिगृहात राहतात.

या शाळेला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम मुलींनी ‘गुड मॉर्निंग’ म्हणत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत केले. यावर माननीय दादांनी गुड मॉर्निंगला मराठीत काय म्हणतात असा प्रश्न केला. त्यावर विद्यार्थ्यांनींना काही सांगणे शक्य झाले नाही, त्यामुळे प्रेमाने गुड मॉर्निंगच्या ऐवजी ‘सुप्रभात’ शब्द वापरत असल्याचे सांगितले. आणि सर्वांना चॉकलेट वाटप केले.

त्यानंतर माननीय दादांनी “माझ्याशी कोण बोलणार?” असे विचारताच, राजनंदनी नरेंद्रसिंह घोरपडे, रेखा भीमा शेट्टी आणि आरोही अविनाश तुपेकर या तीन मुले पुढे आल्या. माननीय दादांनी या तिन्ही मुलींची आत्मियतेने विचारपूस केली. तसेच मोठी झाल्यावर काय होणार? असा प्रश्न विचारला. दादांच्या या प्रश्नानंतर या तिन्ही मुलींनी आपल्या भावना व्यक्त करताना डॉक्टर, पोलीस अधिकारी, शिक्षिका असे सांगितले. त्यानंतर दादांनी ही तिघींचे आनंदाने कौतुक केले.

यानंतर माननीय दादांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वच्छ भारतच्या संकल्पाविषयी सर्व विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली.‌ तसेच, “मी आता दिलेले चॉकलेटचा कागद खाली कुठेही न टाकता, कचरा पेटीतच टाकावा,” असे समजावून सांगितले.

विद्यार्थिनींशी संवादानंतर जिव्हाळा फाऊंडेशनच्या संचालिका ॲड. शर्वरी मुठे आणि अनुराधा शाळेच्या शिक्षिका सोनिया मारणे, निलिमा वाडकर, सुजाता जोशी, विनया चौधरी, योगिनी शिंदे, मोनिका कदम, दादांनी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर शिक्षिकांना सुकन्या समृद्धी योजनेची माहिती देऊन, सर्व‌ विद्यार्थिनींचे सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकत्व घेतले.

तसेच, संस्थेच्या शिक्षिकांनी पुण्यातील शाळांचे सर्वेक्षण करावे, आणि ज्या विद्यार्थिंनीच्या एका पालकाचे निधन झाले आहे, अशा एक पालक असलेल्या विद्यार्थिनींची माहिती संकलित करावी. या सर्व विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची घोषणा माननीय चंद्रकांतदादांनी यावेळी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading