Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

गोपाळकृष्ण शाळेत ‘क्रीडा महोत्सव’

पुणे: गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धा ‘ क्रीडा महोत्सव ‘ सुरू आहेत. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पत्रकार मित्र समाधान काटे, विशाल सातपुते व ज्ञानेश्वर मोरे यांनी केले. मशाल पेटवून स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे नियोजन क्रीडाप्रमुख रणजित बोत्रे यांनी केले.

यावेळी क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली. उपक्रीडाप्रमुख विशाल चव्हाण यांनी क्रीडा प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपाली गावडे यांनी केले. विद्यार्थांचा बौद्धिक विकास, मानसिक विकास आणि त्याचबरोबर विद्यार्थांचा शारीरिक विकास व्हावा म्हणून सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी सांगितले.

सदर क्रीडा महोत्सवामध्ये धावणे, लिंबू चमचा,बुक बॅलन्स,दोरी उड्या,सरळ रेषेत टायर चालवणे या वैयक्तिक स्पर्धा आणि लंगडी,डॉजबॉल या सांघिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यावेळी गीतांजली कांबळे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading