Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती चंद्रकांत पाटील यांचे पत्र


पुणे:राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये शाई फेकण्यात आली होती.त्यानंतर शाई फेकणारे तीन जण आणि एक वृत्तवाहिन्याच्या पत्रकाराला अटक करण्यात आली होती. नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि मविआ आक्रमक झाली होती. ठिकठिकाणी पाटील यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. पत्रकार हा शाई फेकणाऱ्यांसोबत मिळून होता, असा आरोपही पाटील यांनी केला होता. त्यानंतर ११ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. आता या प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी पडदा टाकत हा वाद इथेच मिटवावा अशी मागणी करत प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी या प्रकरणात ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, ती मागे घ्यावी अशी मागणीही केली आहे.
माफी नाफ्यात चंद्रकांत पाटील म्हणाले,

जय महाराष्ट्र , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते , महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे.
त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत . शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते.
मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो.
माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी . तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे.
माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही . माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती.

आपला
चंद्रकांत (दादा) पाटिल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading