fbpx

जळगाव दूध संघावर कुणाचा झेंडा ? गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वर्चस्वासाठी टक्कर…

जळगाव : जळगाव दूध संघाची निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली ती गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांनी एकमेकांवर केलेल्या कुरघोडीने. आज जळगाव दूध संघाच्या २० जागांसाठी निवडणुकीची मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरु झाली असून या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करताना वातावरण चांगलेच तापवले होते.

जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा 7 तालुक्यात आज मतदान प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीला ४४१ मतदार आहेत. भुसावळ मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळमध्ये एक मतदान केंद्र लावण्यात आले आहे. या केंद्रावर 44 जण मतदान करणार आहेत.

जळगाव दूध संघ निवडणूकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन या जळगाव तालुक्यातून उमेदवार आहेत. जळगाव शहरातील सत्य वॉलभ मतदान केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी आणि त्यांच्या सासू मालती महाजन यांनी मतदान करून मतदानाचा पहिला हक्क बजावला असल्याचे पाहायला मिळाले दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस पहायला मिळत असली तरी एकनाथ खडसे या निवडणुकीत एकटे पडल्याचं चित्र आहे. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार खडसे यांच्याविरोधात आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारण पाहता, शिंदे-भाजप गटासाठीदेखील ही लढाई सोपी नाही. त्यामुळे या राजकीय आखाड्यात कोण विजयी ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: