fbpx
Friday, December 8, 2023
ENTERTAINMENTLatest News

टीव्ही अभिनेत्री कामना पाठक अड‍कली विवाहबंधनात

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दबंग दुल्‍हनिया कामना पाठक वास्‍तविक जीवनात देखील दुल्‍हनिया बनली आहे. अभिनेत्रीने ८ डिसेंबर रोजी नागपूरमध्‍ये विवाह सोहळ्यादरम्‍यान तिचा दीर्घकाळापासून मित्र व अभिनेता संदीप श्रीधरसोबत विवाह केला. विवाहप्रसंगी त्‍यांचे जवळचे नातेवाईक आणि काही इंडस्ट्री मधील मित्रमैत्रिणी उपस्थित होते.

या विवाह सोहळ्याबाबत सांगताना कामना पाठक म्‍हणाली, “अखेर मी विवाहबंधनात अडकली आहे आणि ते होणारच होते. माझ्या अवतीभोवती असलेल्‍या सर्वांना माझ्या जीवनातील जोडीदाराबाबत आणि मी केव्‍हा विवाह करणार याबाबत उत्‍सुकता होती. प्रत्‍येकवेळी हा प्रश्‍न आला की माझ्याबाबत चर्चा सुरू व्हायची. अखेर तो क्षण आला आणि मी खाजगी समारोहामध्‍ये जिवलग मित्र व कुटुंबियांच्‍या उपस्थितीत संदीपसोबत विवाहबंधनात अडकले. आमचा विवाह सोहळा चार दिवस चालला. साखरपुड्यासह सोहळ्याची सुरूवात झाली. नागपूरमध्‍ये पारंपारिक महाराष्‍ट्रीयन पद्धतीने विवाह संपन्‍न झाला. मी अद्भुत व वैशिष्‍ट्यपूर्ण महाराष्‍ट्रीयन पद्धतीने सोनेरी कडा असलेली रेशम साडी नेसली होती, तसेच माझ्या कपाळावर मुंडावळ्या बांधण्‍यात आल्‍या. विवाहाच्‍या एक-दोन दिवस आधी आम्ही केळवण हा प्री-वेडिंग मराठी विधीही आयोजित केला होता. हळदी, मेहंदी, संगीत आणि फेरा या सर्व परंपरा ऑरेंज सिटीमध्ये झाल्या, त्यानंतर माझ्या गावी इंदूरमध्ये आमचे भव्य स्वागत करण्‍यात आले. मला वधूच्या पोशाखात पाहून माझ्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले आणि मी देखील तितकीच भावूक झाले. ते अगदी स्वप्नासारखे वाटले, पण सर्व वास्तविक आणि जादूई होते.”

आपला पती अभिनेता संदीप श्रीधरबाबत सांगताना कामना म्‍हणाली, “आम्‍ही अनेक वर्षांपासून रंगभूमीच्‍या माध्‍यमातून एकमेकांना ओळखत होतो आणि आमच्‍यामध्‍ये चांगली मैत्री देखील होती, ज्‍यानंतर आमच्‍यामध्‍ये प्रेम बहरू लागले. आम्‍हा दोघांना आमच्‍या कलेप्रती प्रेम व आवड आहे, ज्‍यामुळेच आम्‍ही एकत्र आलो. असे म्‍हणतात की विवाहाच्‍या वेळी घाबरायला होते, नर्व्हस वाटते. पण मी स्‍वत:ला वधूच्‍या पोशाखामध्‍ये पाहिले आणि सर्व भिती निघून गेली. तो देखील माझ्या स्‍वप्‍नातील राजकुमारासारखा दिसत होता. आम्‍ही पती-पत्‍नी म्‍हणून आमच्‍या नवीन जीवनप्रवासाला सुरूवात करण्‍यास खूपच उत्‍सुक आहोत. आमचे कुटुंब एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखतात आणि त्‍यांनी आम्‍हाला खूप पाठिंबा दिला आहे; संदीप खूप काळजी घेणारा व प्रोत्‍साहन देणारा आहे.”

Leave a Reply

%d