महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला चंद्रकांत पाटील यांचा दावा
पुणे: शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली. तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता? असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.त्यांच्या वक्तव्यावर आता विरोधकांकडून टीका होत आहे. तर दुसरीकडे यावर पाटील यांनी खुलासा केला आहे. ‘मी महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला’ असल्याचा दावा पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे.
पाटील म्हणाले की, मी महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरु केल्या, मात्र यासाठी त्यांनी भिक मागितली असे माझे विधान होते. आता भिक म्हणजे आजच्या काळातील सीआरएस फंड किंवा त्याला आपण देणगी म्हणू शकतो. माझ्या वक्तव्याचं वारकऱ्यांनी स्वागत केले असेही पाटील म्हणाले. तर पुढे बोलतांना ते म्हणाले की, आता प्रत्येक गोष्टीला शेंडा नाही, बोडका नाही म्हणून त्यावर वाद निर्माण करण्याचे जे चाललं आहे, त्याचा जे कोणी ही क्लिप आयकली तर ते म्हणेल या लोकांचा काय चालले आहे.