fbpx

चंद्रकांत दादांनी भीक मागून शाळा बांधावी युवक काँग्रेसची मागणी

पुणे:शाहू, फुले आंबेडकर हे आखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण राजकारण असो समाजकारण असो करत आहे.आज जे काही राज्यातील वैभव आहे ते त्यांच्या कर्तृत्वाने आहे. लोकप्रतिनिधी सतत त्यांच्या विचारांना तडा लावून त्यांचा अवमान करत आहेत अशांचा आम्ही जाहीर निषेध करत आहे असल्याचे प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की,सध्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरूच आहे. उच्च शिक्षण मंत्री असलेले भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असं वक्तव्य केलं आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचार धारेवर चालणाऱ्या महारष्ट्रात लोकप्रतिनिधींनी असे महापुरुषांबद्दल वक्तव्य करणे हे खूप निंदनीय आहे.हे त्यांना न शोभणारे आहे, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत आहे.कारण ज्या महापुरुषानी स्वतःचे आयुष्य उद्वस्त करीत फक्त समाजाच्या हितासाठी आहोरात्र झटले झगडले आणि सूर्याचा प्रखर दाह स्वतः झेलून समाजाचा विकास केला आज त्यांची अशा तरेने एखाद्या मंत्र्याने अवमान करणे हे त्यांच्या पदाला न शोभणारे आहे.त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे इशारा रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: