48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? शिवतारे यांचा शरद पवार यांना सवाल
पुणे:पुणे बेळगाव प्रश्नावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतांना आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 48 तासांचा अल्टिमेटम देत इशारा दिला आहे, अन्यथा मी कर्नाटकात जाईल असा इशारा दिला आहे.संजय राऊतही कर्नाटक सरकारसह राज्यातील सरकारवर हल्लाबोल करत आहेत.48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार ? तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तुम्ही काय केलं ? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांना विचारला.
संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांनी सामना ऑफीसपासून जवळ असलेल्या पत्राचाळीतील जी घरं रस्त्यावर आलेत त्या मराठी बांधवांची काळजी करावी असा टोलाही शिवतारे यांनी संजय राऊत यांनालगावला आहे.
विमानतळ प्रकल्प बारामतीला करण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरविले होते. मात्र, नव्या जागेला केंद्राकडून नकार देण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांत यापूर्वी निश्चित केलेल्या जागेतच प्रकल्प होणार असून सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एमआयडीसी) माध्यमातून भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना पुढील १५ दिवसांत निघेल. असे विजय शिवतारे म्हणाले.