fbpx

अपघाती मृत्यू झालेल्या युवतीच्या नावे फाउंडेशन स्थापन करून रक्तदान शिबिर

कोंढाव्यातील धांडेकर कुटूंबियांचा सामाजिक कार्यास हातभार
पुणे  : दरवर्षी त्या तारखेला तिच्या नावाने दिवा लावणे आणि अश्रू ढाळत बसण्यापेक्षा ती आणि तिचं नाव कायम आपल्यासोबत राहील, असं काही करण्याची इच्छा व्यक्त करत तिच्या आईनेच फाउंडेशनची कल्पना मांडली आणि ‘ऐश्वर्या चॅरिटेबल ट्रस्टचा जन्म झाला. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ऐश्वर्याचा दुर्दैवी अंत झाला. कोंढव्यात आज तिच्या नावाने फाउंडेशन स्थापन झाले असून पहिलाच सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आणि शालेय मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कु. ऐश्वर्या संतोष धांडेकर ही महाविद्यालयीन युवती. नुकतीच दहावी संपली होती. करियरची क्षितिजे खुणावत असताना बिबवेवाडीतील व्हीआयटीच्या कोंढवा येथील महाविद्यालयात तिला प्रवेश घेऊन देण्यात आला. नित्यक्रम सुरू झाला आणि संपूर्ण धांडेकर कुटूंबाचा आयुष्यातलाच म्हटलं तरी चालेल, तो काळा दिवस आला. कॉलेजच्या आवारातच अपघात होऊन निष्पाप ऐश्वर्या गंभीर जखमी होऊन बारा दिवस मृत्यूला झुंज देऊन अखेरीस २/१२/२०१९ रोजी शेवटचा श्वास घेतला..

तिच्या नावाने काहीतरी करावे असा प्रश्न धांडेकर कुटूंबाच्या मनात फेर धरत होता. अखेर ऐश्वर्याच्या आईने दिपाली धांडेकर यांनीच ही कोंडी फोडली आणि ऐश्वर्या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. आज ऐश्वर्याचा तिसरा स्मृतिदिन. या दिवसाचे औचित्य साधून आजच या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कर्करुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. सुजित निलेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेले शिबीर उत्कृष्टरित्या पार पडले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्यासह संगिता ठोसर, वृषाली कामठे, विरसेन जगताप, गंगाधर बधे , संदिप बधे, साहेबराव धांडेकर, संतोष चिंचकर, गणेश कामठे, अमित जगताप, मधुकर मुरकुटे, संतोष धांडेकर, अमित जाधव, श्रीकांत गायकवाड आदी याप्रसंगी उपास्थित होते. अर्चना जाधव यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. या शिबिरासाठी अक्षय ब्लड बँकेचे चेअरमन संजयकुमार शिंदे त्याचप्रमाणे संतोष चिंचकर आणि त्यांच्या टीमने सहकार्य केले. तसेच ममता फांऊडेशन याठिकाणी धान्यवाटप करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: