Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिका रंजक वळणावर !

‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघणार हा आध्यात्मिक टप्पा सध्या चरणसीमेवर असून चिमणाजी – पार्वती या दांपत्याने बालशंकरचा केलेला सांभाळ आणि आता त्याने त्यांना सोडून जाण्याचा क्षण निर्माण होणे, प्रेक्षकांना भावुक करणार आहे.

शंकर या दांपत्याला सोडून निघाला असला तरी त्याने आई पार्वतीची इच्छा पूर्ण करून तिला संततीसुख प्राप्त होईल याची दैवी रचना केली आहे, त्यानुसार पार्वतीला अपत्यप्राप्तीचे वेध लागले असून पार्वतीचे डोहाळे जेवण, शंकरच्या भावंडांचा जन्म असा रंजक कथाभाग मालिकेत सादर होणार आहे.

आई आणि मुलाच्या अनोख्या नात्याचा हा अनुपम सोहळा उमा पेंढारकर आणि आरुष बेडेकर यांनी विलक्षण मायेने संस्मरणीय केला आहे.

बघत राहा योगयोगेश्वर जय शंकर’ सोम ते शनि संध्याकाळी ७.०० वा आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading