Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मला दिव्यांग खात्याचा कारभार मिळाल्यास आनंद होईल -बच्चू कडू

पुणे:माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. बच्चू कडू आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची इच्छा बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. पुन्हा मंत्री झालो तर आवडेल. त्यातही दिव्यांग मंत्रालयाचं काम करता आलं तर त्यासारखा आनंद नाही. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढतो. या लढ्याने एक आंदोलनकर्त्याला आमदार आणि मंत्री केलं. त्यामुळे या खात्याचा कारभार मिळाल्यास आनंद होईल.असं बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार माझ्यासाठी महत्वाचं नाही. दिव्यांग मंत्रालयासमोर विस्तार ही लहान गोष्ट आहे. वंचितांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी सांगतील.असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जनशक्तीसाठी तुम्ही काय केलं? दिवयांगासाठी आम्ही दहा वेळा गेलो, एकदा ही मीटिंग झाली नाही. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अश्या शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही. असे बोलून बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
भाजपमध्ये छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय.असं संजय राऊत म्हणाले. त्यावर बच्चू कडू म्हणाले.संजय राऊत यांचं म्हणणं काही अंशी खरंच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक आक्षेपार्ह बोलतात.कुठल्याही महापुरुषांबद्दल बोलणे उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो, असंही बच्चू कडू म्हणालेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading