Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलच्या वतीने पुण्यात व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन


पुणे : जन्मजात हृदयरोग (सीएचडी)विकाराने त्रस्त मुलांसाठी सहाय्य म्हणून आणि त्यांच्यामध्ये जागरुकता वाढण्याच्या तसेच सीएसआर निधी उभारण्याचा एक भाग म्हणून आरसीपीसीच्या वतीने पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे ११ डिसेंबर पासून आयोजन करण्यात येणार आहे.

या संदर्भात रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर अनिल परमार यांनी व्यावसायिक खेळाची शक्ती आणि प्रसार वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आरसीपीसीला धन्यवाद दिले.

जन्मलेल्या प्रत्येक ५ मुलांपैकी एका मुलाला जन्मजात हृदयरोगाची व्याधी असते. त्यावर शस्त्रक्रीया हा एकमेव उपटारक असून, त्यासाठी किमान १.५ लाख रुपये खर्च येतो. अशा खर्चिक उपचारासाठी मोठ्या आर्थिक फायद्या खेरीज अशा प्रकल्पांसाठी निधी आकर्षित करण्यासाठी या वेगळ्या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. याचा प्रसार वाढविण्यासाठी आमच्या प्रत्येक जिल्ह्यातील क्लब पर्यंत पोहचवू, असेही अनिल परमार यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी निधी उभा करण्यासाठी आमचा पहिला प्रयत्न बॉक्सिंग स्पर्धेने सुरु होतो. लोणी काळभोर येथील एमआयटी विद्यापीठ परिसरात पुरुष आणि महिला विभागात या स्पर्धेचे ११ डिसेंबर पासून आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विजेतेपदासह एकूण आठ लढती येथे होतील, अशी माहिती आरसीपीसीचे अध्यक्ष उदय धर्माधिकारी यांनी दिली. पुणे फाईट नाईट या शिर्षका अंतर्गत ही स्पर्धा होईल. या दोन्ही स्पर्धांना जागतिक बॉक्सिंग परिषदेने मान्यता दिली आहे. पुरुषांच्या लढती १० फेऱ्यांच्या, तर महिलांच्या लढती ८ फेऱ्यांच्या होतील. जागतिक बॉक्सिंग परिषदेच्या लाईव्ह टी.व्ही वाहिनीवरून थेट प्रक्षेपण होईल.

यामध्ये जागतिक विजेता तमिळनाडूचा जे. साबरी मिझोरामच्या एचसी लार्लेमफेला अशी लढत होईल. महिला गटात अव्वल मानांकित मुग्धपटू हरयाणाची चांदनी मेहरा वि. विजय लक्ष्मी अशी लढत होईल, अशी माहिती भारतीय बॉक्सिंग परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर पीकेएम राजा यांनी दिली.

या वेळी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. मगेश टी कराड, एमआयटी आणि एडीटी विद्यापीठ सदस्य कुलगुरु कावास पुंडले यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण प्रोत्साहन दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading