fbpx

डीईएसमध्ये वाहनचालकांची क्रीडा स्पर्धा संपन्न

पुणे : डीईएसच्या टिळक रस्ता प्रांगणातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. धावणे, रस्सीखेच, बादलीत चेंडू टाकणे, बूक बॅलन्सिंग या खेळांचा समावेश होता.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. डॉ. कुंटे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक या विषयीचे महत्त्च स्पष्ट केले. डीईएसच्या फिजिओथेरपी विभागाच्या दीप्ती भोळे आणि शरयू रायबोले यांनी वाहनचालकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सोप्या व्यायाम प्रकारांची माहिती दिली.

न्यू इंग्लिश स्कूल, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय आणि डीईएस इंग्लिश मीडियम या शाळांतील वाहनचालकांनी सहभाग घेतला. मुख्याध्यापिका दर्शना कोरके, सुरक्षा अधिकारी प्रदीप अष्टपुत्रे, आनंदा पाटील, सुनेत्रा वेदपाठक, स्वाती राजगुरू, सुभाष निंबाळकर, प्रवीण जाधव, आनंद पाटील, डेंगळे यांनी संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: